एन. एम. एम. एस. परीक्षेत सुजल कांबळे चे सुयश
न्यूज प्रारंभ डिजीटल मिडिया
बीड (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नुकताच एन एम एम एस परीक्षेचा निकाल जाहीर केला असून विवेकानंद विद्या मंदिर बीड मधील चि.दिलीप कांबळे या विद्यार्थ्यांने यश संपादन केले असून शासनाकडून मिळणाऱ्या 60 हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीसाठी तो पात्र झाला आहे.
ग्रामीण भागातील शिरापूर धुमाळ येथील रहिवासी असलेले दिलीप कांबळे यांचा तो मुलगा असून ते स्वतः रिक्षा चालक आहेत . मुलांना उच्च शिक्षण मिळावे करिता शहरात आलेले आहेत. दिलीप कांबळे यांनी विद्यालयाचे आभार मानले आहेत.
सुजल याने शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्याची शिरापूर ग्रामस्थ, नातेवाईक , परिवार व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .जगताप सर सर्व शिक्षक वृंद , तसेच दै.पार्श्वभूमी पत्रकार गणेश गुजर यांनी कौतुक करून पुढील शिक्षणास शुभेच्छा दिल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या