झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

झरे /प्रतिनिधी



न्यूज प्रारंभ डिजीटल मिडिया 

झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे ता. आटपाडी येथे 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 


यावेळी विद्यालयातील ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर व उपाध्यक्ष व माजी सैनिक भालचंद्र मेटकरी यांनी केले. 



यानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.



यावेळी विद्यालयाचे कलापथक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच मुलींचे लेझीमनृत्य गावातील नागरिकांत चर्चेचा विषय ठरले होते. मुलींनी सुंदर नृत्य करत गावातून फेरी काढली. यानंतर ग्रामपंचायत झरेच्या वतीने करण्यात येणारे मारूती मंदिराजवळील सार्वजनिक ध्वजारोहण करण्यात आले.



दुसऱ्या सत्रात विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनींची भाषणे झाली. यानंतर विविध कलागुणांत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. 



त्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत शिल्प निदेशक या पदी निवड झाल्याबद्दल ऐश्वर्या संभाजी यादव हिचा विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 



यावेळी राजस्थानचे लुंबाराम प्रजापती यांच्यावतीने विद्यार्थी व विद्यार्थीनींना सुग्रास भोजन देण्यात. त्यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. देवानंद घोणते सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच अनेक पालकांनी विद्यार्थांना खाऊ साठी बिस्किटे व गोळीपुडे दिले. 



75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर म्हणाले बोलताना म्हणाले की, देशाची सत्ता ज्या दिवशी धर्मांध शक्तींच्या हातात जाईल त्या दिवशी लोकशाही संपुष्टात येईल, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते ते आज स्पष्ट दिसत आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेले यातले अनेक घटक भारतात कमकुवत होत आहेत. धर्मांध शक्ती सत्तेवर आल्यापासून याची सुरूवात झाली. मात्र अलिकडे लोकशाहीची मूल्ये लक्षणीयरित्या घसरत असल्याचे त्यांनी सांगितले.



यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी, सचिव भिमाशंकर स्वामी, जागृती वाचनालयाचे संचालक दिलीप वाघमारे, , आटपाडी तालुका आरपीआय अध्यक्ष धनंजय वाघमारे, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे दशरथ घोरपडे, बाळू माने, पांडूरंग पुकळे, कांताशेठ माने, अश्विनी पारेकर, सुनिल तरसे, संतोष वाघमारे, सचिन जुगदर, कवी व लेखक सिताराम अनुसे, देशपांडे मॅडम इत्यादी पालक तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*