झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व क्रांतीसिंह नाना पाटील यांची पुण्यतिथी साजरी

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व क्रांतीसिंह नाना पाटील यांची पुण्यतिथी साजरी



झरे / प्रतिनिधी 

झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व क्रांतीसिंह नाना पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी यावेळी संस्थेचे चेअरमन प्रा. श्री. साहेबराव चवरे, सचिव भीमाशंकर स्वामी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी मुख्याध्यापक देवानंद घोणते, सर्व शिक्षक स्टाफ व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज म्हणजेच 6 डिसेंबर रोजी स्मृतिदिन आहे. 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला होता.


या दिवसाला 'महापरिनिर्वाण दिन'  म्हटलं जातं. डॉ. बाबासाहेबांवर महापरिनिर्वाणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 डिसेंबर रोजी मुंबईमधील दादरस्थित चैत्यभूमी येथे बौद्ध धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अस्पृश्यतेसह अनेक चुकीच्या प्रथा नष्ट करण्यासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी गोरगरिब-वंचित घटकांची स्थिती सुधारण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बौद्ध धर्माचे अनुयायी मानतात की, ते भगवान गौतम बुद्ध प्रमाणेच दुसऱ्यासाठी जीवन जगले. बौद्ध अनुयायांच्या मते डॉ. आंबेडकरांनाही त्यांच्या कार्यातून निर्वाण मिळाले आहे. म्हणूनच त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते.


डॉ. आंबेडकर यांनी अनेक वर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कारही बौद्ध धर्मानुसार करण्यात आले. दादर चौपाटी, मुंबई येथे डॉ. आंबेडकरांवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले ते ठिकाण आता चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते.


क्रांतिसिंह नाना पाटील 3 ऑगस्ट , 1900 मध्ये त्यांचा जन्म झाला. 6 डिसेंबर 1976 हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात. त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये परिचित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वाघमारे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*