डॉ. सविता गिरे-पाटील यांना "महाराष्ट्राची सावित्री"पुरस्कार जाहीर
वडूज प्रतिनिधी - रविराज महामुनी-
वडूज (ता- खटाव)येथील दादासाहेब गोडसे कला,वाणिज्य,व विज्ञान महाविद्यालयाच्या उप-प्राचार्या डॉ. सविता गिरे-पाटील यांना सकाळ माध्यमचा " महाराष्ट्राची सावित्री " हा पुरस्कार जाहीर झालेला आहे.
सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या "जागर सावित्री" या लेखमालेमध्ये डॉ. सविता गिरी-पाटील यांचे काम अवघ्या महाराष्ट्राने अनुभवले. त्या समाजासाठी देत असलेले योगदान समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे .त्यांच्या या कार्यालयाचा एक इतिहास तयार होऊन तो पुढच्या पिढीसाठी ही मार्गदर्शक ठरलेला आहे. या कार्याची "जागर सावित्री" चा मधून सकाळ माध्यम समूहाने नोंद घेतली. आणि डॉ.सविता गिरी-पाटील यांचे कार्य महाराष्ट्राच्या समोर यावे ,सामाजिक व्यासपीठावर सन्मान व्हावा यासाठी एक माहेरवाशीन म्हणून साडी चोळीचा मान घेण्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक कार्याचे साक्षीदार होण्यासाठी येत्या २३ जुलै २०२३ रोजी पुण्यामधील हॉटेल मेरीगोल्ड या ठिकाणी "महाराष्ट्राची सावित्री "हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमामध्ये डॉ. सविता गिरी-पाटील यांच्यावर आधारित असणाऱ्या "वूमन पॉवर" तिच्या कर्तुत्वाची सक्सेस स्टोरी हे मराठी, इंग्रजी ,हिंदी या तीन भाषांमध्ये असलेले पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे.
डॉ.सविता गिरे-पाटील या समाजासाठी तसेच परिसरातील महिला व मुलींसाठी एक आदर्श आहेत. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल शिवाजी शिक्षण मंडळ वडूज, तसेच विविध स्तरांवरून ,आदींसह परिसरातील मान्यवर यांच्या कडून अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या