झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाची सलग चौदाव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
प्रतिनिधी /झरे
झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. काल जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. यानिमित्ताने आज शनिवार दि. 18 जून 2022 रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे, सचिव भिमाशंकर स्वामी, पालक अधिकराव माने, धनंजय वाघमारे, वामन पाटील, केशव तरसे, तेजस दिक्षित, सौ. महामुनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कुमार श्रेयश बिरू घोरपडे याने 93.60% आणि कुमार विश्वजीत सुभाष बेरगळ याने 93.60% मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर कुमार सुयश अधिकराव माने याने 92.80% मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. तर कुमार संकेत सुरेश पवार याने 92.60% मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्याचबरोबर कुमार : रोहनराज केशव तरसे 92.40%, कुमार : सौरभ विजय वगरे 92.20% कुमारी : प्रतिमा वामन पाटील 92.00%, कुमार : गुरूराज मोहन चवरे 91.40% कुमार : केतन संजय सुळे 90.20% अशी उत्तुंग भरारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे, सचिव भिमाशंकर स्वामी, सर्व संचालक, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
शाळेतील कर्तव्यदक्ष शिक्षकांनी शाळेला नावारूपाला आणले आहे. त्यामुळे शिक्षणासाठी जागरूक असलेले पालक या शाळेची निवड करतात. आजही आटपाडी सारख्या दुष्काळी पट्ट्यातील व दऱ्या खोऱ्यातील मुले या शाळेत नाव नोंदविण्यासाठी उत्सुक आहेत. येथे शिक्षणाबरोबर शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध यासह विविध स्पर्धा परीक्षांसाठी केली जाणारी तयारी विद्यार्थी व पालकांना आकर्षित करते. येथील अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीत नैपुण्य प्राप्त केले आहे. शाळेचे पटांगण फुलझाडांनी बहरले असून, स्वच्छ व सुंदर परिसर नयनरम्य आहे. झरे पंचक्रोशी जनता विद्यालय या शाळेने क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेत परिसरात नावलौकिक प्राप्त केला आहे. तंत्रज्ञानाची साथ घेऊन विद्यार्थ्यांची ज्ञानाची कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न होत आहे. शिक्षणाबरोबर संगीताचे धडे देऊन परिपूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांची धडपड असते. शैक्षणिक गुणवत्तेचा ध्यास घेतलेल्या या शाळेतील अनेक विद्यार्थी प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती यासह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशोशिखरावर पोचले आहेत. गुणवत्तेच खणखणीत नाणे म्हणून शाळेने आपले वेगळे वैशिष्ट्य जपले. त्यामुळे परिसरातील अनेक विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात. शाळेने १५ वर्षांत निर्माण केलेली 'क्रेझ' पटसंख्या टिकविण्याबरोबर ती वाढविण्यातही यशस्वी ठरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या