झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात धर्मराज पाटील यांना श्रद्धांजली
झरे /प्रतिनिधी
झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे पक्षी संशोधन व निसर्ग संवर्धनासाठी धडपडणारा युवा कार्यकर्ता धर्मराज पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मंगळवार दि. 1 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांचे निधन झाले होते. गेले काही दिवस त्यांची अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज सुरू होती. काल दि. 2 फेब्रुवारी 2022 रोजी विद्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे, सचिव भिमाशंकर स्वामी, मुख्याध्यापक देवानंद घोणते, ज्येष्ठ शिक्षक बिरू घोरपडे, रमेश सादिगले आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते.
धर्मराज पाटील यांच्या राहत्या घरी त्याच्या मेंदूला आघात बसला (ब्रेन स्ट्रोक). ते एकटेच राहत असल्याने यासंदर्भात कोणालाच लवकर काही कळले नाही, त्यामुळे त्यांना रात्रभर वैद्यकीय मदत मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांच्या कंपनीतील लोकांनी ते फोन का उचलत नाही म्हणून घरी जाऊन दार तोडले, तेव्हा झालेला प्रकार उघडकीस आला.त्यांना तातडीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ते दाखल झाल्यापासून कोमातच होते. त्यानंतर त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने झरे पंचक्रोशीत दुःखाचा डोंगर पसरला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या