API अमृता चवरे वाघमोडे यांची झरे पंचक्रोशी जनता विद्यालयास सदिच्छा भेट

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 API अमृता चवरे वाघमोडे यांची झरे पंचक्रोशी जनता विद्यालयास सदिच्छा भेट



प्रतिनिधी /झरे

झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे API अमृता चवरे यांची झरे पंचक्रोशी जनता विद्यालयास भेट दिली. यावेळी सौ. प्रभावती स्वामी यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. श्री. साहेबराव चवरे, संस्थेचे सचिव भीमाशंकर स्वामी, सौ. अमृता चवरे - वाघमोडे, सौ. प्रभावती स्वामी, सौ. स्नेहल चवरे, मुख्याध्यापक देवानंद घोणते, ज्येष्ठ शिक्षक बिरू घोरपडे, रमेश सादिगले व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



सौ. अमृता चवरे - वाघमोडे यांचा शैक्षणिक प्रवास अतिशय खडतर होता. ग्रामीण भागातून त्यांनी दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे. त्यामुळे त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे. सौ. चवरे - वाघमोडे यांचे प्राथमिक शिक्षण 'जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरुंदवाडी' येथे झाले. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण झरे येथील 'जवाहरलाल नेहरू विद्यालय झरे' येथे झाले. भारती विद्यापीठ कडेगाव येथे B. Sc. अँग्री ची पदवी घेऊन MPSC चा अभ्यास केला. 2012 मध्ये त्यांची PSI पदी निवड झाली. त्यांची प्रथम नियुक्ती ठाणे पोलीस आयुक्तालयात झाली. त्यानंतर त्यांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवल्याने गृह खात्याने त्यांच्या कामाची दखल घेत नागपूर ग्रामीण मध्ये त्यांची API पदी पदोन्नती केली. सध्या त्या पुणे आयुक्तालयात गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत आहेत.



शनिवार दिनांक 5 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांनी झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे आकस्मिक भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील मुलामुलींकडे असलेले कौशल्य योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरले तर त्याचा जिवनात नक्कीच फायदा होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. विशेषतः ग्रामीण मुलींनी स्पर्धा परिक्षेकडे भविष्यातील संधी म्हणून पहावे, जेणेकरून जास्तीत जास्त अधिकारी हे ग्रामीण भागातून पुढे येतील अशी माझी इच्छा आहे, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. देवानंद घोणते यांनी केले, तर सुत्रसंचालन श्री. प्रविण पारसे यांनी केले. प्रास्ताविक श्री. हिंदूराव वाघमोडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*