API अमोल चव्हाण यांची झरे पंचक्रोशी जनता विद्यालयास सदिच्छा भेट
प्रतिनिधी /झरे
झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे API अमोल चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. श्री. साहेबराव चवरे यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी संस्थेचे सचिव भीमाशंकर स्वामी, मुख्याध्यापक देवानंद घोणते, ज्येष्ठ शिक्षक बिरू घोरपडे, रमेश सादिगले व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
API अमोल चव्हाण हे मुंबईतील धारावी पोलीस ठाण्याचे काम पाहत आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघातील एका अधिकाऱ्याने एका शैक्षणिक संस्थेला भेट दिल्याने बरीच खमंग चर्चा झाली. श्री. चव्हाण यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सांगलीतील 'शांतीनिकेतन विद्या मंदिर' सांगली येथे झाले, तर उच्च शिक्षण कस्तुरबा वालचंद विद्यालयात झाले. श्री. चव्हाण यांनी 'तायक्वांदो क्रीडा' प्रकारात सलग सात वेळा 'राज्य सुवर्ण पदक' प्राप्त केले आहे. यात राष्ट्रीय स्तरावर 3 सुवर्ण पदके जिंकली आहेत. तर दोनदा रौप्यपदक पटकाविले आहे. त्यांची NCC मधून स्पर्धा परीक्षेतूनच त्यांची 2011 मध्ये PSI पदी निवड झाली होती. सप्टेंबर 2020 पासून ते API या पदावर कार्यरत आहेत.
आज दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांनी झरे पंचक्रोशी जनता विद्यालयास सदिच्छा भेट दिली. हे विद्यालय परिसरातील एक नावलौकिक प्राप्त असे विद्यालय आहे. भौतिक सुविधेसह शालेय गुणवत्तेच्या आधारावर हे विद्यालय सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेले आहे. आज API चव्हाण यांनी शाळेला भेट दिल्याने विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणा मिळाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या