विद्यार्थ्यांनी कष्ट,जिद्द,अंगी भिनवावी - तहसीलदार मा.श्री चंद्रशेखर सानप
वार्ताहर/श्री.गणेश रेंदाळे,सांगली जिल्हा प्रतिनिधी.
हुपरी, दि.१८ सप्टेंबर२१: आज दिनांक १७ सप्टेंबर २१ रोजी हुपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या शांता रामकृष्ण दातार इंग्लिश स्कूल व पारिसाण्णा इंग्रोळे ज्युनिअर कॉलेज हुपरी येथे कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत शाळा तेथे कौन्सेलर उपक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रातील करिअर च्या संधी, अभ्यास कसा करावा परिस्थितीवर मात करून यश मिळेपर्यंत प्रयत्न केले पाहिजेत. या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांना करिअर विषयी आता पासूनच जाणीव करून देण्यासाठी.त्यामध्ये आवड निर्माण व्हावी. व्याख्यान आयोजित करण्यात आले.
सदर व्याख्यान मालिकेत मा. चंद्रशेखर सानप साहेब तहसीलदार यांचे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते.मा.सानपसाहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना करिअर विषयी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले.साहेबांची रयत शिक्षण संस्था विषयी असलेले निष्ठा आज ही दिसत होती. या कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक मध्ये विद्यालयाचे मा.प्राचार्य श्री भिसे सर यांनी उपक्रमाविषयी ची माहिती सांगितली.
सूत्र संचालन समुपदेशक श्रीम.पाटील व्ही.एल. तर आभार उपप्राचार्य श्री पाटील सर यांनी मानले. सदर कार्यशाळा सुरळीतपणे पार पडली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या