झरेचे माजी आदर्श सरपंच शामबापू टिंगरे यांचे दुःखद निधन
प्रतिनिधी /झरे
झरे ग्रामपंचायतीचे माजी आदर्श सरपंच शामराव भानुदस टिंगरे यांचे काल रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते बेऐंशी वर्षांचे होते. झरे येथील जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था झरेचे ते ज्येष्ठ संचालक होते. त्यांच्या निधनाने झरे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कै. शामराव टिंगरे हे झरेचे सरपंच असताना झरेसह पंचक्रोशीतील गावांची जलवाहिनी असलेला 'चिमटा' तलाव झाला. तसेच त्यांचा चारा छावणी उभारणीत मोलाचा वाटा होता. रास्ता रोखो आंदोलनात नेहमी सक्रिय सहभाग होता. कै. शामबापू टिंगरे हे अत्यंत करारी स्वभावाचे होते. निष्ठावान भाव असल्याने व एकवचनी असल्याने त्यांचा गावात दबदबा होता.
आटपाडी तालुक्यातील सर्व गावांना पाणी मिळावे म्हणून क्रांतीवीर नागनाथ आण्णांच्या चळवळीमध्ये प्रा. साहेबराव चवरे यांच्या सोबत काम केले होते. झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या जडणघडणीत त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. त्यांच्या जाण्याने कुटुंबासह संपूर्ण झरे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या