मौजे सातेवाडी येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न
तालुका प्रतिनिधी-रविराज महामुनी.
सविस्तर वृत्त,दि.२९.आॕगस्ट २०२१ रोजी मौजे सातेवाडी ता.खटाव येथे खटाव-माण मतदार संघाचे भाजप प्रणीत आमदार मा.जयकुमार गोरे(भाऊ)यांचे प्रयत्नातून १कोटी १० लाख रु.च्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा माढा मतदार संघाचे भाजपचे खासदार मा.रणजितसिंह नाईक निंबाळकर व गोपीचंद पडळकर(विधानपरीषद सदस्य),सदाशिव खाडे(अध्यक्ष-पिंपरी-चिंचवड महानगर प्राधिकरण),विलासराव देशमुख(सभापती माण)यांचे प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ५ वाजणेच्या सुमारास पार पडला.
सातेवाडी गावच्या विकासासाठी म्हणून आवश्यक ती सर्व मदत करणेकामी आम्ही सदैव गावच्या सोबत आहोत असे प्रतिपादन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले. तसेच केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या वतीने ग्रामपंचायतीकरीता मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांची माहिती व त्या योजने कामी पाठपुरावा आपण स्वतः सातेवाडी गावासाठी करणार आहोत असेही पुढे म्हणाले.सातेवाडीच्या विकासासाठी जयकुमार भाऊ मागील काळातही व आत्ताही आपल्या सोबतच आहेत व जर आपण भाजपा पार्टीला सहयोग द्याल तर निश्चीतच आपल्या गावचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.कारण राष्टवादी पार्टिचे राजकारण हे भूलथापांचे राजकारण आहे असे म्हणाले.
नंतर झालेल्या भाषणातून विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुरवातीला सातेवाडीच्या कार्यशील सरपंच मॕडम,उपसरपंच,व बाकीच्या सहकार्यांचे कौतुक केले.व विरोधक सरकारच्या नाकर्तेपणाचा खरपूस समाचार घेतला.बोलताना त्यांनी बारामतीकर बहिण-भाऊ,राज्याचे गृहमंत्री यांनादेखील धारेवर धरल.चिल्लर चा डाॕलर कुटे व कसा होतो अन गृहमंत्री पद हे नोटा गोळा करुन योग्य ठिकाणी पोहचविणार्या विश्वासू कार्यकर्त्याला कस दिल जात हे देखील स्पस्टीकरणासहित सांगितल.भारतीय जनता पार्टी सर्व जाती धर्माच्या जनतेसाठी कायम खुली आहे मात्र,राष्टवादी पार्टी ही प्रायवेट लिमीटेड पार्टी असल्यामुळे घरच्यांन,व्यतीरिक्त ईतरांचा जास्त विचार केला जात नाही.
जयकुमार गोरें भाऊंनी बोलताना कशाप्रकारे आजअखेर खटाव माण जनतेला सत्ताधार्यांनी पाण्यापासून वंचित ठेवलं आणी मतदारांचा विश्वासघात कसा केला हे राजकारण्यांच्या नावानिशी सांगितल.मी खटाव व माण-साठी कशाप्रकारे संघर्ष करुण पाणी आणलं व जनता सुखी केली याचा देखील पुरावा बोलताना सादर केला. या पाण्याच्या जिवावरतीच कसे खटाव-माण सारख्या दुष्काळी भागात पाणी आले म्हणून मोठमोठ्ठाले कारखाने उभे राहिलेत व हा भाग सधन होत चाललाय हे स्पस्ट केल.विकास केला म्हणूनच या दोन्ही तालुक्यातील जनतेने मला ३र्यांदा आमदार बनविले.
सदर कार्यक्रमाचे सुंदर रित्या नियोजन केल्याबद्दल सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य,व कार्यक्रमाचे मुख्य नियोजक विक्रम रोमण यांचे कौतुक केले.सदर कार्यक्रमात सर्व कोरोणा योद्ध्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यामध्ये प्रामुख्याने डाॕ.मोरे,आरोग्य सेवक शिवाजी काळे,सेविका जंगम मॕडम,अंगणवाडी सेविका सुजाता माने,कांता काळे,माधूरी मोरे,चंद्रकला पवार,जि.प.प्रा.शाळा सातेवाडी- शिक्षिका सौ.वळवी मॕडम,शिक्षक सुहासकुमार खाडे,आशा सेविका वंदना बोटे ई.चा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास खटाव तालुका भाजपा अध्यक्ष धनंजयराव चव्हाण,विकल्प शेठ शाह,सुनिल मोरे,काकासो बनसोडे,अनिल माळी,प्रदिप शेटे,संजय माने,सागर डोंबाळे,पत्रकारबंधू धनंजय क्षिरसागर,मुन्ना मुल्ला,निलेश कणसे,नितीन राऊत,विनोदजी खाडे,आयाज मुल्ला,आकाश यादव.आदि मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या