जेष्ठ नागरिकांना कोरोना काळात येणाऱ्या अडचणींवर चर्चा.
खटाव प्रतिनिधी-रविराज महामुनी.
दि.२७,८.२०२१रोजी सायंकाळी ६ ते ७.३०या वेळेमध्ये उप-विभागीय पो.आधिकारी मा.निलेश देशमुख यांनी वडूज पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमधील जेष्ठ नागरिकाना बोलावून वडूज पोलीस स्टेशनच्या महिला पी.आय.मा.पालेकर मॕडम यांचेसमवेत विविध प्रश्नांवरती चर्चा झाली.
यामध्ये प्रामुख्याने जेष्ठ नागरीकांना कोरोणा लसीबाबत जास्तीत जास्त लवकर प्रवृत्त करणे,वडूज शहराच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व बँकानी जेष्ठ नागरिकांसाठी मदत कक्ष उभारणे,बँकानी शक्यतो पत्रव्यवहार करुन त्यांना कमी गर्दीच्या वारादिवशी बोलविणे,चावडीच्या ठिकाणी वारंवार अधिकार्यांची व कर्मचाऱ्यांची असणारी गैरहजेरी व त्यामुळे जेष्ठांची होणारी हेळसांड थांबविण्यात यावी, तसेच मासिक मिटींगला बर्याचश्या विभागाच्या अधिकार्यांची असणारी अनुपस्थिती,गर्दीची ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसंबंधी योग्य त्या उपाययोजना करणे,अशा सर्व प्रश्नांवरती चर्चा झालेनंतर, वरील सर्व विभागांशी व पोलीस प्रशासनामार्फत सर्व ठिकाणी योग्य तो समन्वय साधला जाईल असे वरीष्ठ अधिकार्यांचे मार्फत सांगणेत आले.
सर्व प्रशासकीय विभागांनी आपापले परीने जेष्ठांसाठी मदत कक्षांची लवकरात लवकर उभारणी करावी. सदर मिटींगला जेष्ठ नागरीक म्हणून शशीकला जाधव/देशमुख,राजेंद्रकुमार घार्गे संजय दोशी,जगताप बि आर ,मानसिंग जाधव,विद्याधर कुलकर्णी,प्रकाश घनवट(बापू),हणमंत देवकर,सयाजीराव पाटोळे या सर्वांची उपस्थिती होती.
अशा प्रकारे जेष्ठ लोकांच्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन प्रत्येक महिन्यास मिटींग घेऊन त्यांना भेडसावणार्या प्रश्नांवरती तोडगा काढणार असल्याचे उप-विभागीय पोलीस अधिकारी मा.निलेश देशमुख यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या