मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणिस पदी तुषार दळवी यांची निवड

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणिस पदी तुषार दळवी यांची निवड

अजय कालेकर / पवनानगर



 मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणिस पदी तुषार दळवी यांची निवड करण्यात आली.

मावळचे लोकप्रिय आमदार मा. श्री.सुनिल आण्णा शेळके यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी मा. श्री. कैलासभाऊ गायकवाड(अध्यक्ष, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस), मा. श्री.नारायणराव ठाकर(संघटनमंत्री,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना,मावळ तालुका) , मा. श्री. सुनिल भोंगाडे(अध्यक्ष, सरपंच संघटना मावळ तालुका व कार्याध्यक्ष,




मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस),मा.श्री. अजित चौधरी (सरपंच, शिवली-सडवली ग्रुप ग्रामपंचायत), मा.श्री.अक्षय कालेकर (उपसरपंच, शेवती-येळसे ग्रुप ग्रामपंचायत),युवा नेते श्री.निलेश दळवी, श्री.दिलीप दळवी, श्री.विजय दळवी, श्री.भाऊ दळवी व मान्यवर उपस्थित होते.याआदी तुषार दळवी यांनी मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटणेच्या खजिनदार व सरचिटणिस पदी काम केले आहे तसेच त्यांचा पवन मावळात तरुणां बरोबर दांडगा जणसंपर्क आहे.




त्यामुळे त्यांच्या सारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला पक्षाने सरचिटणीस पदावर कार्य करण्याची संधी दिली आहे.त्यावेळी तुषार दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व सर्व मान्यवरांचे मनःपुर्वक आभार व्यक्त मानले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम निष्ठेने व प्रामाणिकपणे करून पक्षाचा प्रचार व प्रसार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी या निमित्ताने दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*