दुर्गम भागातील आदिवासी भगीनींसह रक्षाबंधन उत्सव साजरा व रक्षाबंधन निमित्त संपुर्ण आदिवासी वस्तीसाठी गिरणी भेट
प्रतिनिधी /अजय कालेकर, पवनानगर
मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी भगीनींसह रक्षाबंधन उत्सव साजरा व रक्षाबंधन निमित्त संपुर्ण आदिवासी वस्तीसाठी गिरणी वाटप. पै.सचिनभाऊ घोटकुले जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांनी मावळ मधील अतिदुर्गम भागातील चावसर येथिल कोटमवाडी आदिवासी वस्तीवर जाऊन रक्षाबंधन उत्सव साजरा करून एक चांगला उपक्रम राबविला.
कोटमवाडी जवळपास दोनशे लोकवस्ती असलेली वाडी आहे या ठिकाणी पै.सचिन घोटकुले यांनी अचानक भेट देऊन येथिल भगीनींसमवेत रक्षाबंधन साजरे केले तसेच त्यांना पिठाची गिरणी भेट देउन सर्वांना मिठाई वाटप करण्यात आली.
यावेळी या महिलांना आनंदाश्रू अनावर झाले.व या पावसामधे आमचा भाऊ आम्हाला भेटायला आला याचे आम्हाला समाधान वाटले.तसेच भर पावसामधे आम्हाला दळण दळण्यासाठी गावात जावे लागत असे सांगुन सर्व महिलांनी सचिन घोटकुले यांना औक्षण करून राखी बांधली.त्यावेळी वसंत तुपे,आत्माराम शिंदे ,उमेश केदारी,काळु उंबरकर,सखाराम पवार ,शंकर मोहोळ,शेखर जगताप,संजय यादव,अक्षय धनवे व ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या