स्वतंत्र दिनाच्या मंगल दिनी इन्कलाब युथ फौंडेशन चा कार्यारंभ..!

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 स्वतंत्र दिनाच्या मंगल दिनी इन्कलाब युथ फौंडेशन चा कार्यारंभ..!

१९ ऑगस्ट २०२१



वार्ताहर: अनिकेत येवारे


        समाजातील अनेक युवकांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असते त्याना क योग्य माध्यम एक योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी इन्कलाब युथ फौंडेशन या संस्थेची सुरवात करण्यात आली. 


     भारत देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो भारत 2022 साली जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जाईल. तरुण म्हणले की उत्साह तरुण म्हणले की सळसळत रक्त पण अश्या तरुणाईला एका विवेकाच्या वाटेवर आणण्यासाठी प्रयत्न करणारे लोक खूपच कमी दिसतात.  या उलट त्यांची ऊर्जा कशी स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यात येईल याची काळजी घेणारे लोक जास्त दिसतील. यासाठी 'इन्कलाब युथ फौंडेशन' तरुणाईला दिशा देण्यासाठी त्यांना एक हक्काच विचारपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, कलेच्या क्षेत्रात, खेळ, आरोग्य, अश्या विविध क्षेत्रात काम करण्यासाठी तरुणांची नवी फळी उभा करण्यासाठी सातत्याने काम करेल अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष रोहित शिंदे यांनी दिली. 



  संस्थेच्या कार्यारंभाची सुरवात 'इन्कलाब' या  पुस्तक प्रकाशन सोहळ्याने झाली. संस्थेचे कार्यारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष साताऱ्यातील जेष्ठ पत्रकार विजय मांडके, तसेच यावेळी प्रमुख उपस्थित राष्ट्र सेवा दल राष्ट्रीय संघटक सदाशिव मगदूम,  NESM चे संचालक दिग्विजय चव्हाण आणि पुस्तकाचे लेखक प्रणित पवार, संपादक सई कावळे आणि योगेश घाटगे, आकाश सूनके, ऋषिकेश मोळके, गौरव घाटगे, मिलिंद कांबळे, शाहिस्ता मुल्ला, राहत सतारमेकर, ऐश्वर्या माने, स्नेहा कोरे, मयूर चव्हाण, हेरंब माळी, शिवकुमार हेगाने, आशुतोष देशमुखे, ओंकार हिरगुडे, दीपक मगदूम, प्रसाद पवार, प्रकाश पवार, रुपेश घोटीकर, अथर्व देसाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*