इंडियन आर्मी मध्ये भरती झालेल्या नवजवानांचा झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या वतीने सत्कार संपन्न
झरे/प्रतिनिधी
इंडियन आर्मी मध्ये 'अग्नीवीर'म्हणून भरती झालेल्या निलेश विठ्ठल खरजे व अजित राजाराम भानुसे यांचा झरे पंचक्रोशी जनता विद्यालय येथे संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर , उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब मुख्याध्यापक देवानंद घोणते सर व सर्व शिक्षक स्टाफ यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.
तसेच झरे पंचक्रोशी जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडा विभागामध्ये विविध मैदानी स्पर्धेमध्ये तालुका भर डंका केला आहे. शाळेने तालुक्यामध्ये जनरल चँपियनशिप मिळवली आहे. यानिमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर यांचे चिरंजीव सत्यजित साहेबराव चवरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना आकर्षक स्पोर्ट्स किट दिले. त्याचे वितरणही यावेळी करण्यात आलं. यावेळी विद्यालयातील खेळाडूंनी खो खो च्या सामन्याचे प्रदर्शन केले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर, उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब, सेवानिवृत्त सैनिक औदुंबर यादव, सध्या इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असणारे दाजीराम पारेकर, अभिजीत भानुसे, प्रतिक भानुसे तसेच मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, ज्येष्ठ शिक्षक बिरू घोरपडे सर, रमेश सादिगले सर, व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या