आंदोलन पेटले. कोल्हापुरातील आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या शिक्षकांची पोलिसांकडून धरपकड. आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी तब्बल पन्नास हुन अधिक शिक्षकांना केली अटक.
कोल्हापूर /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळां कृती समितीच्या नेतृत्वाखाली गेल्या 55 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून कोल्हापूर येथे आंदोलन सुरू आहे. राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांच्यासह तब्बल 50 जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आणि जेव्हा आत्मदहन करण्याची वेळ आली तेव्हा मात्र या शिक्षकांची पोलिसांच्या कडून धरपकड करण्यात आली.
त्यामुळे राज्यातील हजारो अंशतः अनुदानित शिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने ताबडतोब टप्पा वाढीचा शासन आदेश निर्गमित करावा. तसेच प्रचलित नियमानुसार हा जीआर निघावा अशी अपेक्षा राज्यातील तब्बल 63 हजार शिक्षकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येणाऱ्या कॅबिनेट बैठकीकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
आज शिक्षकांची पोलिसांकडून धरपकड केल्यामुळे राज्यातील शिक्षकांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला आहे . शासन दडपशाही धोरण आणू पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संविधानिक पद्धतीने गेल्या 55 दिवसापासून हे आंदोलन सुरू होते. परंतु शासनाने कोणत्याही पद्धतीने लक्ष दिले नाही. त्यामुळे शिक्षकावर आत्मदहन करण्याची वेळ आली आहे. शासनाने लवकरात लवकर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय करून त्वरित शासन आदेश निर्गमित करावा. अन्यथा आणखी आंदोलन तीव्र केले जाईल असा सज्जड इशारा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांनी न्यूज प्रारंभशी बोलताना दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या