टप्पा वाढ विषयावर बैठक संपन्न. लवकरच राज्य सरकार तोडगा काढणार; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही
प्रतिनिधी/कोल्हापूर, संदीप पाटील
राज्य शासनाने 12 जुलै 2024 रोजी वाढीव टप्पा देण्याची घोषणा केली. पण आदेश काढला नाही. त्यामुळे 1 ऑगस्ट पासून राज्यात सर्व विभागात आंदोलन सुरू आहे. आज कोल्हापूरातील आंदोलनाचा 24 वा दिवस सुरू आहे. अजुन किती दिवस शिक्षक रस्त्यावर बसणार यामध्ये लक्ष घालण्याची विनय कोरे यांना विनंती केली.
त्यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, कालच याबाबत माझी बैठक झाली आहे. त्यामध्ये काही अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी मी सुचना दिलेल्या आहेत. त्या पूर्ण ही होत आहेत. हा विषय लवकरच संपेल. आजपर्यंत आम्हीच दिले आहे. आताही यांना आम्हीच न्याय देणार आहोत.
त्यावेळी आ. विनय कोरे यांनी सांगितले की, याबाबत मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलतो. आज अंशतः अनुदानित शिक्षकांनी माजी मंत्री आमदार विनय कोरे सावकार यांच्या वारणानगर येथील कार्यालयात दुपारी 4 वा. भेट घेतली.त्यांनी सर्वासमोर शिक्षणमंत्री यांना फोन करून जीआर बाबत विचारणा केली. त्याबद्दल त्यांचे कृती समितीच्या वतीने आभार व्यक्त केले.
दरम्यान जोपर्यंत टप्पा वाढीचा शासनाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होऊन जीआर निघत नाही. तोपर्यंत लढा सुरूच राहील. सोमवार दि 26 पासूनपासून महिला सह अनेकजण आमरण उपोषणाला बसणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांनी दिली आहे.
यावेळी जि. प . सदस्य श्री. विकास माने, व श्री राजेंद्र माने यांनी या भेटीसाठी प्रयत्न केले.यावेळी शिवाजी कुरणे,केदारी मगदूम, युवराज पाटील,हेमंत धनवडे, जालिंदर कांबळे,भानुदास गाडे ए.बी. पाटील, विनायक सपाटे,शिवाजी घाटगे,धनाजी पाटील एम एन पाटील अविनाश पाटील,अभिजित आपटे, उत्तम जाधव, सचिन मरळीकर, संभाजी आडुरकर नेहा भुसारी, भाग्यश्री राणे, जयश्री पाटील तेजस्वीनी पाटील,सुमन नरुटे,आशा राजमाने,यांच्या सह सुमारे 200 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या