झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे वारकरी दिंडीचे आयोजन
झरे/प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील झरे येथे आज मंगळवार दि. 16 जुलै 2024 रोजी वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनींनी तसेच पालकांनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूर कडे विठुरायाच्या भेटीसाठी दिंड्या जात असतात. देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे पालखी सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. विद्यार्थी-विद्यार्थिनी वारकरी वेशभूषेत उपस्थित होत्या. खांद्यावर भगवी पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठुरायाच्या भजनाच्या नादात गावातून पुढे जाऊ एस. टी. स्टँड परिसर ते मारुती मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली.
यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी तसेच विविध संतांची वेशभूषा, नऊवारी साडी व कुर्ता, पायजमा असा पोशाख परिधान करून दिंडीची रंगत वाढविली. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सुद्धा वारकरी पोशाखात आले होते.
झरे पंचक्रोशी जनता विद्यालय ही शाळा झरे परिसरासह जिल्ह्यात नावाजलेली शाळा आहे. या शाळेत अनेक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे या शाळेत प्रवेशासाठी पालकांची झुंबड उडालेली असते. या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांतून कौतूक केले जात आहे.
मुख्याध्यापक देवानंद घोणते सर , ज्येष्ठ शिक्षक रमेश सादिगले सर बिरू घोरपडे सर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडीस प्रारंभ केला. त्यानंतर गोलाकार रिंगणात विद्यार्थी उभे राहून हरिनामाचा जयघोष केला. यावेळी वारकरी नृत्यही सादर केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी फुगडी खेळाचा आनंद लुटला. दिंडी सोहळा गावातून मुख्य पेठेतून नेण्यात आला. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर, उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब, सचिव भीमाशंकर स्वामी सर व सर्व संचालक यांनी दिंडी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या