नवनियुक्त प्राथमिक शिक्षक राहुल सासणे यांचा सत्कार संपन्न

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

नवनियुक्त प्राथमिक शिक्षक राहुल सासणे यांचा सत्कार संपन्न

झरे/ प्रतिनिधी

श्री. प्रविण पारसे सर

झरे ता. आटपाडी येथील राहुल मच्छिंद्र सासणे यांचा आज शनिवार दि. 29 जून 2024 रोजी झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा.साहेबराव चवरे सर व सचिव भीमाशंकर स्वामी सर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

राहुल सासणे यांची पवित्र पोर्टल मार्फत रत्नागिरी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. सलग चौदा वर्षे अतिशय खडतर परिश्रम घेऊन त्यांना हे यश मिळाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा.साहेबराव चवरे सर व सचिव भीमाशंकर स्वामी सर , सर्व संचालक तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनींनी अभिनंदन केले.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*