झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी
झरे /प्रतिनिधी
झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 150 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. साहेबराव चवरे सर व भीमाशंकर स्वामी सर यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना संस्थेचे सचिव भीमाशंकर स्वामी सर म्हणाले की, आपल्या संस्थानातील निर्धन,दुर्लक्षित घटकांचे दुःख,यातना,व्यथा,निरक्षरता ह्या गोष्टींचे मुळ म्हणजे शिक्षणाचा अभाव असल्याने शाहू महाराजांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल अन् मागास घटकांना शिक्षणाचा मार्ग दाखविला.
संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. श्री. साहेबराव चवरे सर म्हणाले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे लोकहितधार्जिणे राजे होते. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावला. समाजातील मागासवर्गीय जाती-जमातीच्या लोकांना शिक्षणाची कवाडं खुली केल्याशिवाय त्यांचा बौद्धिक,सामाजिक व आर्थिक विकास होणार नाही,हे जाणून शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं करून त्यावरील शैक्षणिक शुल्क माफ केलं.तसेच आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविणाऱ्या पालकांना प्रतिमाह एक रुपया दंड लावण्याची कायदेशीर तरतूद केली.सुमारे ५०० अन् त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या खेड्यांमध्ये त्यांनी प्राथमिक शाळा उघडल्या.विविध शिष्यवृत्त्या देऊन बहुजन समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आजीवन प्रयत्न केले.प्रौढ स्त्रियांना शिक्षणासाठी प्रवृत्त करणाऱ्या शिक्षिकांना महाराजांकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असे.विभिन्न जातीधर्मांतल्या विद्यार्थ्यांसाठी शाहूंनी आपल्या संस्थानात वसतिगृहे काढली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक देवानंद घोणते सर , ज्येष्ठ शिक्षक रमेश सादिगले सर , बिरू घोरपडे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या