कटफळ येथील मृत महिला मजुरांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
झरे/प्रतिनिधी
झरे ता. आटपाडी येथील जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे चेअरमन प्रा. साहेबराव चवरे सर व सचिव भीमाशंकर स्वामी सर यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून मंगळवार दि. 18 जून रोजी कटफळ येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा महिलांच्या कुटुंबीयांची व नातेवाईकांची विचारपूस व सांत्वन करण्यासाठी आज गुरुवार दि. 20 जून रोजी भेट देऊन सांत्वन केले.
सोलापूर जिल्ह्यातील महूद ते दिघंची रस्त्यावर सातपुतेवस्ती पाटीजवळ गावाकडे जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाहनाची वाट पाहात उभ्या असलेल्या कटफळ येथील महिला मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले होते.
या दुर्घटनेत सहा महिला मजुरांना जीव गमवावा लागला. यात इंदूबाई बाबा इरकर (वय ५०), भीमाबाई लक्ष्मण जाधव (४५), कमल यल्लाप्पा बंडगर (४०), सुलोचना रामा भोसले (४५), अश्विनी शंकर सोनार (१३), मनीषा आदिनाथ पंडित (५०) या ठार झाल्या होत्या.
झरे परिसर, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, संस्था तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत असे प्रा. साहेबराव चवरे सर यांनी यावेळी सांगितले. तसेच या कुटुंबातील शिक्षण घेत असलेली मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाऊ नयेत म्हणून जी काही मदत करता येईल ती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू , असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या