व्यसनमुक्त युवक संघाच्या आटपाडी तालुकाध्यक्ष पदी प्रविण पारसे
झरे/प्रतिनिधी
झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरेचे शिक्षक श्री. प्रविण निवृत्ती पारसे यांची व्यसनमुक्त युवक संघाच्या आटपाडी तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांच्या शिफारशीने युवक मित्र बंडा तात्या कराडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
श्री. प्रविण पारसे सर यांनी आतापर्यंत शैक्षणिक संघटनेत सुद्धा अनेक पदे भूषविली आहेत. इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे कडक शिस्तीचे शिक्षक म्हणून त्यांची विद्यार्थ्यांत ओळख आहे. तसेच ते निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात. सामाजीक कार्यात देखील सदैव अग्रभागी असणाऱ्या प्रविण पारसे यांना अध्यात्माची सुद्धा आवड आहे. सरस्वती भजनी मंडळाच्या माध्यमातून ते झरे परिसरासह महाराष्ट्रात अध्यात्मिक जनजागृती करत आहेत.
दरम्यान, आटपाडी तालुक्यातील प्रत्येक गावात व्यसनमुक्त युवक संघाची शाखा निर्माण करणार असल्याचे व तालुक्यातील प्रत्येक गाव व्यसनमुक्त करण्यासाठी जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जगद्गुरु तुकोबाराय निर्याण त्रीशतकोत्तर अमृत महोत्सव व्यसनमुक्त युवक संघाचा रोप्य महोत्सव युवक युवतींसाठी 25 वा प्रतापी संस्कार सोहळा दि. 8 मे ते 15 मे 2024 अखेर देहू येथे संपन्न झाला . यावेळी ही नियुक्ती करण्यात आली.
युवक मित्र बंडातात्या कराडकर यांचे वैराग्य मूर्ती तुकाराम महाराज जीवन चरित्रपट दररोज तसेच वाचन सर्व अध्यात्मिक उपक्रम, व्याख्यान, प्रवचन, हरिकीर्तन, विशेष व्यक्ती परिचय, शाहिरी पोवाडे, भारुड, मर्दानी खेळ, गजनूत्य, लेझीम पथक, गुणवंतांचा विविध मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा व इतर नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न झाले. इंद्रायणी तीरावर गाथा मंदिरात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा दैदीप्यमान सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रविण पारसे यांनी झरे पंचक्रोशी जनता विद्यालयातील अनेक विद्यार्थी देहू येथील बालसंस्कार शिबिरासाठी त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर नेले होते. यासाठी त्यांना सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक व सुप्रसिद्ध कीर्तनकार दादासाहेब नरळे गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या