झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या 100 टक्के निकालाची परंपरा सलग 16 व्या वर्षी कायम

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या  100 टक्के निकालाची परंपरा सलग 16 व्या वर्षी कायम

झरे /प्रतिनिधी 

झरे ता. आटपाडी येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाने इयत्ता दहावीच्या 100 टक्के निकालाची परंपरा सलग सोळाव्या वर्षी  कायम ठेवली आहे.

शैक्षणिक वर्ष 2023/24 मध्ये झालेल्या S.S.C. परीक्षेमध्ये झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाने उत्तुंग यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी सुद्धा इयत्ता दहावीचा निकाल 100% लागलेला आहे.

    यामध्ये वाघमोडे शुभम बाळासो याने 94.40% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर सादिगले प्रथमेश रमेश याने 94.00% गूण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर जावीर अनिकेत गजानन 93.20% गूण मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच वगरे यश आनंद याने 92.40% व सादिगले सुदर्शन रमेश 92.20% गूण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व  मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा.साहेबराव चवरे सर , उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब , सचिव भीमाशंकर स्वामी सर ,  सर्व संचालक तसेच मुख्याध्यापक श्री. देवानंद घोणते सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच झरे पंचक्रोशीतील सर्व पालक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*