झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात 'महाराष्ट्र दिन' व 'कामगार दिन' साजरा

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 झरे पंचक्रोशी जनता विद्यालयात 'महाराष्ट्र दिन' व 'कामगार दिन' साजरा 



झरे /प्रतिनिधी, श्री.प्रविण पारसे 

झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे आज बुधवार दि. 1 मे 2024 रोजी 'महाराष्ट्र दिन' व 'कामगार दिन' साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा.साहेबराव चवरे सर व सचिव भीमाशंकर स्वामी सर यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याने सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, औद्योगिक, सांस्कृतिक, राजकीय, अध्यात्मिक, चित्रपट, संगीत, साहित्यिक, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन 'जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था' , झरेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे सर यांनी केले. 



पुढे बोलताना ते म्हणाले की, 1 मे 1960 रोजी भाषावार प्रांतरचनेनुसार 'महाराष्ट्र राज्याची' स्थापना झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली. अतिशय चारित्र्यसंपन्न व निष्कलंक व्यक्तीमत्वाचा प्रा. साहेबराव चवरे सर यांनी उहापोह केला.



 १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. यानंतर भाषेच्या आधारावर राज्याची स्थापना करण्याचा निर्णय झाला. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या या लढ्यात १०६ आंदोलकांना आपल्या जीवाचं बलीदान द्याव लागलं. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तरी संयुक्त महाराष्ट्र होण्याचं स्वप्न काही प्रमाणात अपुरचं राहिलं. बेळगाव, कारवार, निपाणी, हुबळी, धारवाड, बिदर भालकी हा कर्नाकातील मराठी भाषिक भूभाग अद्यापही महाराष्ट्रात सामील होऊ शकला नाही. 



कामगार दिनानिमित्त बोलताना प्रा .साहेबराव चवरे सर म्हणाले की, १ मे हा दिवस जगभर कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात जगभरातील कामगार चांगल्या कामाच्या परिस्थिती आणि अधिकारांसाठी एकत्र येऊ लागले. १ मे १८८६ रोजी कामगार आठ तासांच्या कामाच्या दिवसाच्या मागणीसाठी शिकागोतील कामगार रस्त्यावर उतरले. हेमार्केट स्क्वेअरमध्ये श्रमिक रॅलीदरम्यान बॉम्बचा स्फोट झाल्यावर शांततापूर्ण निदर्शन सुरू असताना त्याला हिंसक वळण मिळालं. परिणामी पोलीस अधिकारी आणि आंदोलक दोघेही जखमी झाले. कामगारांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचे प्रतीक असलेल्या या आंदोलनानं जगभरातील कामगार चळवळीला चालना दिली. पुढे भांडवलदार वर्गाकडून नफ्यासाठी कामगारांचे होणारे शोषण, कामाचे निश्चित तास नसणे, आठवड्याची सुट्टी, किमान वेतन कायदे, कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियम यासारख्या अन्याय कारक गोष्टींवर कामगार वर्गाची एकी वाढत गेली. १८८९ मध्ये पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमध्ये कामगार आंदोलनात वीर मरण आलेल्या शहीदांचा सन्मान करण्यासाठी आणि सर्वत्र कामगारांशी एकता प्रदर्शित करण्यासाठी १ मे हा अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय कामगार दिन घोषित केला.



यावेळी शैक्षणिक वर्ष 2023-24 चा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला. इयत्ता नववी मध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा.साहेबराव चवरे सर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी सचिव भीमाशंकर स्वामी सर, मुख्याध्यापक देवानंद घोणते सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वाघमारे सर यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*