झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या स्तुत्य उपक्रमाची झरे परिसरात तुफान चर्चा
गेल्या काही दिवसांपासून टेंभू योजनेच्या पाण्याने झरे परिसर अक्षरशः ओलाचिंब झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून झरे परिसरात मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. आटपाडी तालुक्यातील पाणी टंचाई पाहता हे पाणी नागरिकांसाठी वरदान ठरत आहे.
आटपाडी तालुक्यातील झरे येथील झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी या पाण्याचा सुयोग्य वापर केला आहे . शाळेच्या उत्तरेकडील बाजूला काही अंतरावर हे पाणी वाहत आहे. म्हाकूबाई मंदिरापासून हे पाणी वाहून पुढे चिमट्याच्या तलावात जात आहे.
झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या प्रांगणात तब्बल 100 हून अधिक झाडे आहेत. ही झाडे पाण्यावाचून वंचित होती. विद्यार्थ्यांनी घरातून कळश्या व हांडे इत्यादी भांडी आणून मानवी साखळी करून या झाडांना पाणी घातले. त्यामुळे परिसरातील 100 हून अधिक झाडांना जीवदान मिळाले आहे . शाळेच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाने विविध उपक्रमांमुळे परिसरात नावलौकिक मिळविला आहे . या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांत सामाजिक जाणिव निर्माण झाली आहे . तसेच झाडांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले आहे . विद्यार्थ्यांनी सुद्धा आम्ही दरवर्षी दोन झाडे लावून ती जगवू अशी शपथ घेतली आहे.
या उपक्रमासाठी महेंद्र यादव सर, भास्कर चौधरी सर दादासाहेब बनगर सर , प्रविण पारसे सर हिंदूराव वाघमोडे सर संतोष वाघमारे सर, रमेश सादिगले सर बिरू घोरपडे सर व मुख्याध्यापक देवानंद घोणते सर यांच्यासह , विद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थीनींनी यासाठी खूप मेहनत घेतली.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्राध्यापक साहेबराव चवरे सर, उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी साहेब ,सचिव भीमाशंकर स्वामी सर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे .
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या