7th Pay Commission : नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्त्यात 50 टक्क्यांंपर्यंत वाढण्याची शक्यता

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 

7th Pay Commission : नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्त्यात 50 टक्क्यांंपर्यंत वाढण्याची शक्यता

न्यूज प्रारंभ डिजीटल मिडिया 


मोदी सरकार नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याची शक्यता आहे. 2024 च्या सुरुवातीला केंद्र सरकार महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवण्याचा मोठा निर्णय घेऊ शकते.

दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकार 48 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना त्यांच्या महागाई भत्त्यात आणि जानेवारी ते जून या महिन्यांसाठी महागाई भत्ता वाढवून देते. केंद्र सरकारला जानेवारी ते जून 2024 या महिन्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करण्याची गरज आहे. पण 2024 मध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकार मार्च महिन्यात नव्हे तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घेऊ शकते. कारण पुढील वर्षी एप्रिल ते मे दरम्यान लोकसभा निवडणुका होणार आहेत.

महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या निमित्ताने महागाई भत्त्यात वाढीची भेट देऊ शकते. केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा डीए वाढवते. AICPI डेटानुसार, सरकार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा डीए कधी तीन टक्के तर कधी चार टक्क्यांनी वाढतो. आता नव्या वर्षात महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ होऊन महागाई भत्ता 50 टक्के होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं (Modi Government) दिवाळीपूर्वीच (Diwali 2023) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Employees) महागाई भत्त्यात (DA Hike) 4 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे सध्या महागाई भत्ता 46 टक्के आहे. 

महागाई सवलतीतही वाढ होण्याची शक्यता 

सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासोबतच पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीतही वाढ केली जाते. डीए आणि डीआरमधील या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनवर होतो. सध्या सातव्या वेतन आयोगांतर्गत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 46 टक्के DA आणि DR दिला जात आहे. सरकारने महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला तर, महागाई भत्ता आणि सवलत 46 टक्क्यांवरून 50 टक्के होईल.

4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डीए आणि डीआर 50 टक्क्यांपर्यंत वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होईल. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 9000 रुपयांनी वाढणार आहे. सरकार ही वाढ जानेवारी ते फेब्रुवारी किंवा मार्चनंतर वाढवू शकते.

डीए मूळ वेतनात सामील होईल?

महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर तो मूळ वेतनात एकत्र होईल आणि महागाई भत्ता शून्य होईल आणि महागाई भत्त्यात नव्याने वाढ होईल, असा दावा अनेक अहवालांमध्ये सातत्याने केला जात आहे. पण, असं होणार नाही. कारण सातव्या वेतन आयोगाने 50 टक्के महागाई भत्ता असल्यास मूळ वेतनात विलीन करण्याची शिफारस केलेली नाही. सहाव्या वेतन आयोगानेही अशी कोणतीही शिफारस केलेली नाही. दरम्यान, 50 टक्के महागाई भत्त्यानंतर सरकार आठवा वेतन आयोग स्थापन करण्यात येणार का, असा प्रश्न निर्माण सध्या उपस्थित होत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*