महत्वपूर्ण तीन बातम्या
1. अनुदानासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करा - शासनाचे महत्त्वाचे आदेश निर्गमित.
न्यूज प्रारंभ डिजिटल मिडिया
अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा/तुकड्यांवरील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान देण्याची कार्यवाही तात्काळ करणे तसेच अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पत्र निर्गमित केले आहे.
संदर्भः १. शासनपत्र क्रमांक- माशाअ-२०२३/प्र.क्र.२८५/एसएम-४, दि.९.११.२०२३
२. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. शिआका/ २०२३/२३९११/शाळा अनु. / आस्था क माध्य/ ७१४२, दिनांक २१.११.२०२३
उपरोक्त विषयान्वये, शासनाचे संदर्भ क्रमांक १ चे पत्र व आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संदर्भ क्रमांक २ चे पत्र पहावे. (प्रत संलग्न)
शासनाने शासन निर्णय दिनांक ६.०२.२०२३ मधील अ, ब व क मध्ये नमूद प्राथमिक शाळा व त्यामधील वर्ग / तुकड्यांना अटी व शतीच्या अधीन राहून अनुदानास पात्र घोषित केले आहे व दिनांक १.०१.२०२३ पासून अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे.
अनुदानाची कार्यवाही शीघ्रतेने व्हावी यासाठी शासनाने शासन परिपत्रक दिनांक २४.०४.२०२३, दिनांक २५.०९.२०२३ व शासन पत्र दिनांक २६.०९.२०२३ अन्वये सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
शासन निर्णय दिनांक ६.०२.२०२३ व उपरोक्त शासन परिपत्रक व शासन पत्रातील अटी व शर्तीनुसार अनुदान पात्र प्राथमिक शाळांची तपासणी करून त्यावरील पात्र शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान मंजूर करण्याबाबतची कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत दिनांक ३१.१२.२०२२ पर्यंत पूर्ण करावी. अशी कार्यवाही करत असतांना कोणत्याही शिक्षकावर/ कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी.
तसेच, पुढील प्रत्येक वर्षी माहे सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणित संचमान्यता पूर्ण करून सदर संचमान्यतेनुसार अनुदानास पात्र ठरत असलेल्या शाळा/तुकड्यांवरील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याबाबतचा प्रस्ताव (आर्थिक भारासह) या कार्यालयास सादर करावेत, अशा सुचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.
अनुदान मंजूरीबाबतची कार्यवाही शीघ्रतेने होणेबाबत कार्यवाही अपेक्षित आहे. ही बाब विचारात घेता अनुदान मंजूरीबाबत शासनाने संदर्भीय पत्रान्वये दिलेल्या कालमर्यादेचे कटाक्षाने पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत शासनाने दिलेल्या कालमर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना अनुदानाच्या आशा वाढल्या आहेत.
2. गुड न्यूज: राज्य सरकारी कर्मचारी मालामाल, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ, कधीपासून लागू होणार? तारीख ठरली!
न्यूज प्रारंभ डिजिटल मिडिया
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ (DA Hike) केली आहे. राज्य सरकारने चार टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता आता 42 टक्क्यावरुन आता 46 टक्के करण्यात आला आहे. एक जुलै 2023 पासुनची महागाई भत्त्याची थकबाकीही मिळणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो. आज अर्थ विभागाने शासन निर्णय काढून महागाई भत्ता वाढवण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. याआधी 30 जून 2023 रोजी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती.
3. शिक्षक भरतीमध्ये होणार कुणबी प्रमाणपत्राचा लाभ
न्यूज प्रारंभ डिजिटल मिडिया
राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असून, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांना ओबीसीचा फायदा मिळेल. शिक्षकांची कमतरता असल्याने शाळांवर जो परिणाम झाला आहे, तो गृहित धरता लवकरात लवकर भरती होईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.रविवारी सकाळी जळगावच्या अजिंठा शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी ते बोलत होते.
शिक्षकांची भरतीप्रक्रिया व दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी, यामुळे भरती प्रक्रियेवर काही परिणाम होईल का, या प्रश्नावर दीपक केसरकर म्हणाले, भरती प्रक्रिया करत असताना अनेक ठिकाणी आरक्षित जागा या खुल्या प्रवर्गात टाकल्यामुळे खुल्या जागांची संख्या कमी झाली होती. आम्ही प्रयत्नपूर्वक या सर्वांची पाहणी करून खुल्या जागा वाढविल्या. याबाबत मराठा समाज संघटनांचीही मागणी होती. यामुळे खुल्या प्रवर्गात पुरेशा जागा उपलब्ध झाल्या. ईडब्लूएस आरक्षणाचा फायदा या भरतीमध्ये मिळेल.
तसेच, मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. जे खुल्या प्रवर्गात आहेत त्यांना त्यातून संधी आहेच, मात्र ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसीचा फायदा मिळू शकेल, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या