पिंगळी तलावाची दुरुस्ती करा, अन्यथा कार्यालयासमोर आंदोलन करणार...

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 पिंगळी तलावाची दुरुस्ती करा, अन्यथा कार्यालयासमोर आंदोलन करणार...

   निवेदनामार्फत पाटबंधारे विभागाला राजू मुळीक यांचा इशारा


   दहिवडी:-(प्रतिनिधी)

            दहिवडीजवळ पिंगळी येथे असणारा पिंगळी तलाव तलावाचे सध्या नामोनिशान मिटण्याच्या मार्गावर आहे.अशी परिस्थिती असताना हा तलाव दुरुस्त केला गेला नाही तर आगामी काळात पिंगळी बुद्रुक, पिंगळी खुर्द,मोरेमळा वाघमोडेवाडी,गोंदवले बुद्रुक पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.




              पिंगळी तलावाच्या भराव्यावर तसेच आतील बाजूला काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. त्याचप्रमाणे तलावातील काटेरी झुडपे आहेत. भराव्यावर वाढलेली झुडपे यांच्या मुळ्या खोलवर रुजून भरावा पोकळ करू शकतात आणि पिंगळी तलावाचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. तलावाच्या क्षेत्रांतर्गत वाढते अतिक्रमण त्याचबरोबर वाढती झाडेझुडपे यामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आहे.

         पाटबंधारे विभागाने धोका ओळखून भराव्यावर वाढलेली झाडे झुडपे काढून भरावयाची दुरुस्ती करावी,येत्या पंधरा दिवसात आपण विशेष लक्ष देऊन ही दुरुस्ती केली नाही तर ग्राहक प्रबोधन समितीच्या मार्फत आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्राहक प्रबोधन समितीचे माण-खटाव अध्यक्ष,श्री.राजू मुळीक यांनी दिलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*