झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे माजी आमदार गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे माजी आमदार गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण


प्रतिनिधी / झरे

झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे माजी आमदार गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे, उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी, सचिव भीमाशंकर स्वामी, सर्व संचालक, मुख्याध्यापक देवानंद घोणते व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते. 


 स्व. गणपतराव देशमुख यांनी विधानसभेमध्ये तब्बल 55 वर्षे सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. सोलापूरमधील अश्विनी हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. 


क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या 'कायम स्वरूपी 13 दुष्काळी तालुक्यांची पाणी चळवळी' चे ते अग्रणी नेते होते. याच पाणी परिषदेच्या माध्यमातून जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था झरेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे व सचिव भीमाशंकर स्वामी यांचे ते निकटवर्तीय होते. 


देशमुख यांना काही दिवसांपूर्वी पित्ताचा त्रास होत असल्याने सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत होते. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. 


देशमुख यांचा १० ऑगस्ट १९२६ रोजी जन्म झाला. शेतकरी कामगार पक्ष व सांगोला विधानसभेच्या माध्यमातून गणपतराव देशमुख यांनी सलग पन्नास वर्षे आमदार म्हणून महाराष्ट्राची विधानसभा गाजवली. १९६२ साली ते सांगोल्यातून निवडून आले. त्यांनी शेकापमधूनच आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली होती. १९७८ साली शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या पुलोद सरकारमध्ये त्यांचा मंत्री म्हणून समावेश होता. त्याशिवाय १९९९ सालीही ते मंत्रिमंडळात होते.


२०१२ साली आमदार म्हणून सुवर्णमहोत्सवी ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल सभागृहामध्ये विशेष सत्कार केला होता. २०१९ साली त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. १९७२ आणि १९९५ या दोन पंचवार्षिक निवडणुकांचा अपवाद वगळता सर्व निवडणुकांमध्ये देशमुख यांनी विजय प्राप्त केला होता. २०१४ साली त्यांनी शेवटची विधानसभा निवडणूक लढवली. आजपर्यंत त्यांनी बारा वेळा विधानसभा निवडणूक लढवली. महाराष्ट्राच्या विधानसभेचा चालताबोलता इतिहास म्हणून गणपतराव देशमुख यांच्याकडे आजपर्यंत पाहिले गेले.


'विधानसभेचे विद्यापीठ' अशीही त्यांची राज्याच्या राजकीय वर्तुळात ओळख होती. एक पक्ष एक मतदारसंघ आणि एका विचाराने त्यांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द राहिली आहे. आमदार तसेच महाराष्ट्राचे रोजगार हमी योजनेचे मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*