लिंगायत समाजोन्नती परिषद चे वतीने त्यांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 लिंगायत समाजोन्नती परिषद चे वतीने त्यांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला


वार्ताहर: अनिकेत येवारे 


८ ऑगस्ट २०२१

आज समाज भवन मिरज येथे लिंगायत समाजातील मिरज शहरातील प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ  डॉक्टर शरण रविकांत पाटील सर व जिल्हा परिषद अध्यक्षा शरणी प्राजक्ता ताई कोरे यांना राज्यपाल यांचे हस्ते नवभारत हेल्थ केअर अवॉर्ड ने सन्मानित केलेबद्दल  लिंगायत समाजोन्नती परिषद चे वतीने त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. 


लिंगायत समाजातील डॉक्टर रविकांत पाटील यांनी कोविड काळात उल्लेखनीय सेवा केलेबदल तसेच 14 दिवसात 40 बेड चे कोविढ हॉस्पिटल उभा करून एक नवा विक्रम केला आहे. सेवा सदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मुळे मिरजेचे नाव आज देशात झाले आहे. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता ताई कोरे यांनी ही जिल्ह्यात गावपातळीवर आरोग्य केंद्राद्वारे लोकांना कोरोना उपचार उपलब्ध करून दिले. 


तसेच क्रीडा संकुल ला 150 बेड चे हॉस्पिटल उबे करून अनेक नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. याबद्दल त्यांना नवभारत हेल्थ केअर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले होते. तसेच लिंगायत बांधव देशसेवा करून निवृत्त झालेले जवान संदीप डोंगरे यांचा ही सत्कार आज करण्यात आला. ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुरणे, माजी महापौर विजयराव धुलुबुळू, बबनराव भंडारे, नगरसेवक संजय बापू मेंढे, सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक गणेश माळी, गजेंद्र कुलोळी, संभाजी नाना मेंढे, नगरसेविका बबिता मेंढे, जयश्री ताई कुरणे, शंकर इसापूर,डॉक्टर पंकज म्हेत्रे,जयगोंड कोरे, अनिल हारगे, जितेंद्र मोतुगडे, विक्रम पाटील, उमेश हारगे, राज कबाडे, रमेश मेंढे,  सचिन केरीपाळे.  राजू सन्नके. सुनील कित्तूरे,   गंगाधर कुरणे, मनोहर कुरणे, श्रीकांत महाजन, विनायक मेंढे , डाॅ.  हेमंत म्हेत्रे, रुपाली गाडवे, साधना माळी, अनिता हारगे,  सौ.अनिता कोरे आदी लिंगायत बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन लिंगायत समाजोन्नती परिषद चे अध्यक्ष  बाबासाहेब आळतेकर, व ईश्वर जनवाडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*