शाब्बास! 'आप्पा' , तू इतिहास घडवलास!

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 शाब्बास ! 'आप्पा' , तू इतिहास घडवलास!

आप्पा रामचंद्र माळवे 

गरीब, कष्टकरी, शेतकरी व अल्पशिक्षित कुटुंबातील आप्पाने झरे पंचक्रोशीसह जिल्ह्यात इतिहास रचला! 

प्रतिनिधी /झरे

झरे येथील जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था झरेचे, झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली या विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या विद्यालयाचा याहीवर्षी शंभर टक्के निकाल लागला आहे. 

चैतन्य देवानंद घोणते 


यामध्ये आप्पासो रामचंद्र माळवे या विद्यार्थ्यांने 99.60%  गुण मिळवून विद्यालयासह परिसरात नावलौकिक मिळवलेला आहे. तसेच चैतन्य देवानंद घोणते याने 98.20 % तर सुमन राजाराम पाटील 92.60% गुण मिळवले आहेत. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे, उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी, सचिव श्री. भीमाशंकर स्वामी, सर्व संचालक तसेच मुख्याध्यापक देवानंद घोणते व सर्व स्टाफ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


सुमन राजाराम पाटील 
झरे पंचक्रोशी जनता विद्यालय हे परिसरात नावलौकिक मिळवलेले विद्यालय आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शालेय उपक्रम राबवता आले नाहीत. अन्यथा इतर वेळी शालेय उपक्रमांबाबतील शाळेचा नावलौकीक जिल्हाभर आहे. भौतिक सुविधांसह सुसज्ज इमारत, अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकवृंद, माध्यान्ह भोजन योजना, मोफत शालेय गणवेश व पाठ्यपुस्तके, स्पर्धा परीक्षेसाठी सराव वर्ग, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण ज्ञानरचनावादी वर्ग, कृतीयुक्त अध्यापन, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, माता मेळावा व पालक मेळावा,  मोफत वैद्यकीय तपासणी, सर्वसमावेशित शिक्षण, दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत साधन साहित्य, शासकीय शिष्यवृत्तींचा लाभ व विशेष शिक्षकांमार्फत प्रभावी अध्यापन, अध्यापन स्तर निश्चिती, गुणवत्ता विकास कार्यक्रम, फिरती प्रयोगशाळा, क्षेत्रभेटी, बालवाचनालय, क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी येथील शिक्षक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. शाळेच्या या उज्ज्वल यशाबद्दल झरे पंचक्रोशीतील पालक, ग्रामस्थ व आजी माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे. अशा गरिब व होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन व मदत केली जाईल असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे यांनी पालकांना फोन करून करून आश्वस्त केले.
Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*