भुजंगपाटीलवाडी येथे ट्रान्सफार्मर उतरवताना वायरमन जखमी

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0


तळगाव वार्ताहर- रमेश जाधव




           गेली अाठ दिवस तळगाव पैकी भुजंगपाटीलवाडी
 ता. राधानगरी या गावासाठी वीज पुरवठा करणा-या ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड होवुन त्या वीजवाहिनी मध्ये अतिउच्च दाब तयार झाल्यामुळे  येथील घरातील विद्युत उपकरणे जळाली होती, त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता व पोलसुद्धा वाकुन पडण्याच्या अवस्थेत होता. ग्राम पंचायत व गावकरी मंडळी यांनी कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विभाग 33/11 केवी उपकेंद्र कसबा तारळे यांना याबाबत निवेदन दिले होते.
               
      निवेदनात म्हंटले होते की घरगुती उपकरणांचे नोंद करून योग्य तो पंचनामा करावा आणि गावच्या ट्रांसफार्मर/डीपी अथवा वाहिनीमध्ये बिघाड असल्यास लवकरात लवकर बदली करून किंवा सुस्थितीत करून गावचा वीजपुरवठा सुरळीत करावा. तसेच कोरोना सारख्या महामारी मुळे अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना जळालेल्या उपकरणांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे तसेच सध्या पावसाळा रोप लावणी चे दिवस चालू असताना घरी वीज नाही करमणुकीचे साधन नाही कारण घरचे टीव्ही, एलईडी बल्ब, मोबाईल चार्जर, इत्यादी वस्तू खराब झाले आहेत. तरी या  तक्रार अर्जाची दखल घेऊन नागरिकांना लवकरात लवकर योग्य ती नुकसान भरपाई मिळावी.
            त्यानुसार अाज सोमवार दि. २० रोजी सदरचा ट्रान्सफार्मर बदलनेसाठी उपकेंद्रातील वायरमन व कर्मचारी घटनास्थळी अाले असता वायरमन एस. टी. पाटील हे पोलवर चढले होते. यावेळी जुना ट्रान्सफार्मर उतरवताना पोल कोसळला. यावेळी श्री. पाटील यांनी पोलवरुन खाली उडी मारली व त्यांना मुक्का मार लागुन जखमी झाले. वीजपुरवठा सुरळीत होणेकामी ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रकाश भाऊ काटाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*