तळगाव वार्ताहर - रमेश जाधव
राधानगरी तालुक्याच्या उत्तर भागात अंतीम हद्दीमध्ये असणारी गावे चौके , मानबेट अणि गगनबावड़ा तालुक्याची सुरुवात होणा-या सिमेला असणारी सुतारवाडी, गारिवडे या परिसरातील गावांना लागुन घनदाट जंगल अाहे. येथिल लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असुन उस, भात , भुईमूग , नाचणा ही पिके घेत असतात त्यावरच त्याना अवलंबून राहावे लागते. सध्या या परिसरात रानगव्यांचा वावर खुप मोठ्या प्रमाणात वाढला असून येथिल शेतीपिकाचे व परिणामी शेतक-यांचे खुप मोठे नुकसान होत अाहे.
ऐन पावसाळ्यात रात्रौ शेतात जाऊन बळीराजाला गस्त घालावी लागत असुन गव्यांचा कळप हाकलण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालावा लागतोय.
अाधिच कोरोनाचं संकट चालु आहे त्यात शेतकरीवर्गाने आपली शेती कशिबशी पिकवली असून आता भात, भुईमूग, ऊस अशी पिके गव्यांचे कळप येवुन फस्त करत अाहेत. अाता तर हे गव्यांचे कळप दिवसाढवळ्या शेतीपिकात येवुन नुकसान करत अाहेत. त्यामुळे येथिल शेतकरी हतबल झाले अाहेत. तरी संबंधीत वनविभागाने या गव्यांचा कायमचा बंदोबस्त लावण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतक-यांकडुन होत आहे...
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या