भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनानिमित्त डी. आर डी. ओ तर्फे ऑनलाइन वेबिनारचे आयोजन...

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0


           प्रतिनिधी
         श्री. नारायण    भिलाणे,
      दोंडाईचा


       डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आज 27 जुलै 2020 रोजी 5 वा स्मृतिदिन त्या त्यानिमित्ताने ऑनलाइन तामिळनाडू येथील  डी. आर. डी. ओ कडून राष्ट्रीय वेबिनारचे  आयोजन  दोन सत्रात घेण्यात आले होते.सकाळ सत्रात डी. आर. डी. ओ. प्रमुख मा. डॉ . सतीश रेड्डी (चेअरमन डी. आर. डी. ओ) ,  मा . तरुण  मृगेश चेन्नई, मा. डी. जयकुमार, मा.अर्चना श्रीधरणे , त्यांनी डॉ. कलाम साहेबांचे महानकार्य सांगून
तामिळनाडू येथील अग्निपंख फाऊंडेशनचे ध्येय व उद्देश सांगून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रोत्साहित करून "तरुणांना घडवणं" हा डॉ. कलाम साहेबांचा ध्यास पूर्णत्वास नेण्यास सांगितले.  आपल्याला  प्रचंड मेहनत करायची आहे. भारताला  फार पुढे न्यायचे आहे व सामर्थ्यशाली बनवायचेआहे. प्रेम,सकारात्मकता या मूल्यांची जपणूक,जीवनविषयक तत्वज्ञान, स्वप्न पाहणं आणि परीश्रमाचे महत्व सांगून प्रेरीत केले व डॉ.कलामांचे विचार तळागाळात पोहचवायचे आहेत.
         दुसर्‍या सत्रात  मार्गदर्शनासहित विद्यार्थी आणि सहभागी शिक्षकांमध्ये प्रश्नोत्तरे घेण्यात आले. आपल्याला पडलेले प्रश्न मांडण्याची संधी वेबिनारमध्ये सहभागी असलेल्यांना मिळाली.  या वेबिनारमध्ये संपूर्ण देशभरातून वेगवेगळे पदाधिकारी उपस्थित होते व महाराष्ट्रातून अग्निपंख फाऊंडेशनचे जनरल सचिव मा.मिलिंद चौधरी , महाराष्ट्र राज्य को —अॉर्डीनेटर  मा.सौ. मनिषा चौधरी महिला राज्य समन्वयक ,महाराष्ट्र
मा. सौ. जयश्रीताई शिरसाटे ,महाराष्ट्र राज्य समन्वयक मा. गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र, लातूर जिल्हा समन्वयक मा. सौ. वैशालीताई चव्हाण, मा.सौ.जयश्रीताई खोंडे( शिक्षिका) ,
धुळे जिल्हा ग्रामीण समन्वयक मा. अविनाश पाटील,साक्री तालूका समन्वयक मा. नारायण भिलाणे, तालुका समन्वयक उमरखेड
मा.ओमकार चेके ,  यांनी वेबिनारमध्ये सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण फेसबुक, युट्युब व स्थानिक चॅनलवर करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.तरुण मुरुगेसन ,मा. राजेश सर मा.बाळा सर यांनी यशस्वी आयोजन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*