दारू नको, दूध प्या उपक्रमास भरभरून प्रतिसाद. झरेत शेकडो विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

दारू नको, दूध प्या उपक्रमास भरभरून प्रतिसाद. झरेत शेकडो विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

झरे/प्रतिनिधी 


सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे पंचक्रोशी जनता विद्यालय येथे विद्यालयातील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षकांनी  व्यसनमुक्तीची शपथ घेतली. तसेच युवक मित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या व राज्यभर राबविण्यात येत असलेल्या 'दूध प्या, दारू नको' या उपक्रमास सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे ग्रामीण भागातून दिसून येत आहे. आज वर्षाचा शेवटचा दिवस. ३१ डिसेंबर म्हटले की सेलिब्रेशन, पार्टी ओघाने आलीच. विशेषतः तरुणाई तर, या दिवसाची जोरदार तयारी करते. मात्र, केवळ फॅशनच्या नादात व्यसनाधीनतेच्या आहारी जणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे अशी चिंता व्यसनमुक्त युवक संघाचे राज्याध्यक्ष दिपक जाधव यांनी व्यक्त केली.



व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने ही थर्टीफस्टची पार्टी अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ३१ डिसेंबर रोजी चला व्यसनाला बदनाम करू या मोहिमेअंतर्गत ‘दारू नका, दूध प्या’ या अभियानाचे आयोजन केले आहे. अशी माहिती संघटनेचे मार्गदर्शक दादासाहेब नरळे गुरुजी यांनी न्यूज प्रारंभशी बोलताना दिली आहे.



तरुणांना दारूसारख्या व्यसनापासनू दूर ठेवण्याचा यामागाचा हेतू आहे. आपले आरोग्य व्यवस्थित रहावे यासाठी या उप‌क्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. असे आवाहन सांगली जिल्हा व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.



 आटपाडी तालुका व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष प्रविण पारसे यांच्या नियोजनात झरे झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथे व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी व्यसनमुक्त भारत-सशक्त भारत ! आता घुमुद्या एकच नारा, व्यसनमुक्त करूया देश सारा !भारत माता की जय ! अशा विविध घोषणा देण्यात आल्या. 



विद्यार्थांना लहान वयातच योग्य संस्काराचे धडे दिले जात आहेत. याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद यांनी युवक मित्र बंडा तात्या कराडकर व संघटनेचे अभिनंदन केले आहे तसेच आभारही मानले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*