अंशतः अनुदानित शिक्षकांसाठी मोठी महत्वपूर्ण बातमी; उद्यापासून मुख्याध्यापक महामंडळाचे कोल्हापूरात अधिवेशन ; संमेलनाध्यक्षपदी खंडेराव जगदाळे सर
न्यूज प्रारंभ डिजिटल मिडिया
अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे अधिवेशन शुक्रवार दि. 17 नोव्हेंबर 2023 व शनिवार दि. 18 नोव्हेंबर 2023 रोजी संजय घोडावत अतिग्रे ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनासाठी मा. शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दिपक केसरकर तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती संमेलनाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी न्यूज प्रारंभ डिजिटल मिडियाला दिली आहे.
श्री. खंडेराव जगदाळे सर हे या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. ही बाब राज्यातील शिक्षकांसाठी अभिमानाची बाब आहे. राज्यात सध्या अनेक शैक्षणिक प्रश्न आहेत. जुनी पेंशन योजना, अंशतः अनुदानित शाळांचा अनुदानाचा प्रश्न यासह अनेक शैक्षणिक प्रश्न या अधिवेशनात चर्चेला येणार आहेत.
येत्या 17 व 18 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील सर्व मुख्याध्यापक या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. यामध्ये राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांना यामध्ये प्रवेश मिळणार आहे याची नोंद घ्यावी.
तरी राज्यातील समस्त शिक्षक व मुख्याध्यापक या सर्वांनी या अधिवेशनास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या