कोल्हापूर महावितरण समोर वर्कर्स फेडरेशनने केली जोरदार निदर्शने

न्यूज प्रारंभ  - (मुख्य संपादक - श्री. प्रविण पारसे)
By -
0

 कोल्हापूर महावितरण समोर वर्कर्स फेडरेशनने केली जोरदार निदर्शने



तालुका प्रतिनिधी/सचिन लोहार,कागल

 

               महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने प्रलंबित १६ मागण्या करीता आंदोलनाची नोटीस दिली

होती.प्रलंबित मागण्यासाठी दि.८ ऑक्टोंबर २०२१ रोजी प्रचंड मोठ्या प्रमाणावर  द्वारसभा घेऊन सरकार व प्रशासनाच्या धोरणाचा महाराष्ट्रामध्ये निषेध केला.त्यानंतर आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून दिनांक १२ऑक्टोंबर २०२१ रोजी प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रत्येक झोन ऑफिससमोर धरणे आंदोलन करून सरकार व प्रशासनाचा निषेध करावा असे केंद्रीय कार्यकारिणीच्या आदेशानुसार कोल्हापुरातील झोन ऑफिससमोर मंडप घालून मोठ्या प्रमाणात कर्मचारी पदाधिकारी यांनी निदर्शने केली. 


     यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.प्रचंड मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या.त्यावेळी पोलिसांनी खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.त्यावरून संघटनेची असलेली ताकद प्रशासनाला दिसून आली.संघटनेचे  झोनल अध्यक्ष अनिल कांबळे,झोनल सचिव शकील महात,संदीप पाटील,सहसंपादक सुरेश पाटील, उपसंपादक सुनील, मासुले झोनल खजिनदार सर्कल सचिव कोल्हापूर संदीप बच्चे,सर्कल सचिव सांगली प्रमोद पोतदार यांच्यासह अनेक विभागीय सचिव पतसंस्था पदाधिकारी संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने निदर्शनासाठी उपस्थित होते.या निदर्शनाच्या मागण्या खालील प्रमाणे होत्या.


प्रलंबित प्रश्नांची यादी


1) चेंज ऑफ नोटीस न देता व संघटनेशी चर्चा न करता एकतर्फी बदल करण्याचे धोरण बंद करा.2) तिन्ही कंपन्यातील वर्ग एक ते चार प्रवर्गातील रिक्त पदावर तात्काळ भरती करा.3) तिन्ही कंपन्यातील कामगार व अभियंते यांच्या पेट्रोल भत्त्यात पूर्वलक्षी प्रभावाने वाढ करून तात्काळ लागू करा.

4) तिन्ही कंपन्यातील मयत कामगार वारसांना नोकरीत सामावून घ्यावे व ज्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी क्रमांक मिळाला आहे त्या सर्वांना सी.एस-28 लागू करा.5) तीनही कंपन्यातील रखडलेले पदोन्नतीच्या पॅनल तात्काळ घ्या.6) तिने कंपन्यातील बदली धोरण एकसमान करणे परस्पर करण्यात येणारे बदल बंद करा.7) तिन्ही कंपनीतील अंतर्गत भरतीची राखीव पदे तात्काळ जाहिरात काढून भरा.8) पगारवाढ कराराचा तिसरा हप्ता तात्काळ अदा करा.9) महावितरण मध्ये वसुलीच्या नावाखाली सुरू असलेले दडपशाही तात्काळ बंद करा.10) महावितरण कंपनीतील दि.01/04/2019 नंतर कार्यान्वित केलेले 33/11 व 22/11 के.व्ह्री. उपकेंद्रे पूर्ण आउट-सोर्सिंगवर चालविण्यास दिलेला निर्णय तात्काळ रद्द करा.11) महापारेषण कंपनीतील आकृती बंध लागू करण्यासाठी संघटनेचे समवेत चर्चा करून वर्क नॉर्मस निश्चित करा.12) सर्व सहाय्यकाचा तीन वर्षाचा कालावधी सामान्य आदेश-74 करीता गृहीत धरा.13) महानिर्मिती कंपनीत सुरू असलेली अनावश्यक ठेकेदारी पद्धत बंद करून कामगार व अभियंते यांच्या कार्यक्षमतेचा वापर करा.14) महावितरण कंपनीत बदली करताना वापरण्यात येणारी compulsory vecancy पद्धत बंद करा.15) महावितरण कंपनीत प्रत्येक कामात सुरू केलेली Impanelment पद्धत बंद करा.16) महावितरण कंपनीतील कामगारांचे रजा रोखीकरण याचे पैसे तातडीने अदा करा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*