झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
झरे/प्रतिनिधी
झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे येथील श्रीनाथ हिरामन खोटरे याने नवोदय परिक्षेत बाजी मारली आहे. त्याची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल चेअरमन, व्हा. चेअरमन, सचिव, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफने अभिनंदन केले आहे.
झरे पंचक्रोशी जनता विद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील असते. ग्रामीण भागातील व होतकरू विद्यार्थ्यांना या विद्यालयाने आजपर्यंत भरपूर सहकार्य केले आहे. डोंगर, वाडी, वस्त्यावरील विद्यार्थ्यांना याठिकाणी विनामूल्य शिक्षण दिले जाते. याठिकाणी परीक्षा फी वगळता कोणतीही फी आकारली जात नाही. यासह शाळेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. कोरोना महामारीमध्ये सुद्धा श्रीनाथने जिद्द व चिकाटीने अथक परिश्रम घेतले. श्रीनाथच्या निवडीबद्दल त्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या